म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या खास तलवारीचा लिलाव

नवी दिल्ली : म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या खास तलवारीचा लिलाव  झाला. या लिलावाने आतापर्यंतच्या लिलावाचे सर्व रेकॉर्ड तोडले.

टिपू सुलतान यांच्या शेवटच्या पाडावानंतर इंग्रजांना ही तलवार त्यांच्या शयनगृहात सापडली होती. टिपू सुलतान यांनी 1782 ते 1799 या काळात म्हैसूरवर राज्य केले. त्यांच्या तलवारीला ‘सुखेला’ शक्तीचे प्रतीक मानल्या जाते. कर्नाटक राज्यात टिपू सुलतान यांच्यावरुन प्रचंड वादंग पेटविण्यात आले होते. ते हिंदूविरोधी असल्याचा प्रचार करण्यात आला. इंग्रजांविरुद्ध त्यांची लढाई, पारंपारिक शस्त्रांसोबत आधुनिक तंत्राच्या सहायाने भेदक मारा करणारा दारुगोळा त्यांनी वापरला होता. या विधानसभा निवडणुकीत टिपू सुलतान यांच्या नावाचा विखारी प्रचारासाठी वापर झाला. लंडनमध्ये या आठवड्यात या तलवारीचा लिलाव झाला. इस्लामिक आणि इंडियन आर्ट सेलमध्ये £14 दशलक्षमध्ये लिलाव करण्यात आला. भारतीय रुपयांमध्ये या तलवारीचे मूल्य 143 कोटी रुपये आहेत. म्हणजे 143 कोटी रुपयांना या तलवारीचा लिलाव झाला.