
मुंबई : ठाण्यातील अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार आहे. ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले.
सर्वोच्च न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अनंत करमुसे यांनी ठाणे येथील वर्तकनगर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांना 90 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांनी केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या त्यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा करमुसे यांनी करत आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले.