तीन – चार तासात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता

कोल्हापूर : गेले तीन चार दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत आहे.राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही पडल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई कार्यालयाकडून आज दुपारी दोनच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देताना पावसाची शक्यता वर्तवली आहे.हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे .हवामान विभागाकडून लोकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी,असे आवाहनही करण्यात आले आहे.