आजरा तालुक्यातील एकरी ६० टन ऊस उत्पादक मोहिमेचा रविवार दि.१९ मार्च रोजी बक्षीस वितरण : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी : स्वर्गीय सुशिलादेवी आनंदराव आबिटकर ॲग्रीकल्चर फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे वतीने घेण्यात आलेल्या एकरी ६० टन ऊस उत्पादकता वाढ अभियान स्पर्धेचा आजरा तालुक्यातील स्पर्धेचा रविवार दि.१९ मार्च २०२३ रोजी दुपारी १२ वाजता साळगांव (ता.आजरा) येथे शिंपी मळा शेजारी बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, एकरी 60 टन ऊस उत्पादकता मोहिमेच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात जनजागृती करुन शेती क्षेत्राशी संबंधित सर्वांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. यामध्ये राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांकरीता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक 25 हजार, व्दितीय क्रमांक 15 हजार, तृतीय क्रमांक 11 हजार व उत्तेजनार्थ 7 हजार असे बक्षिस देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत आजरा तालुक्यातील स्पर्धेचा रविवार दि.19 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजता साळगांव (ता.आजरा) येथे शिंपी मळा शेजारी बक्षीस वितरण होणार असून जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

News Marathi Content