राज्यात गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर….

मुंबई : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला.

त्यातलेही 9 मृत्यू संशयित आहेत. पण मृतांमध्ये लस न घेतलेल्या बालकांचा समावेश आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जातोय. बालवाड्या, पाळणाघरं, अतिजोखमीच्या भागांवर प्राधान्यानं लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय झालाय. तर केंद्रानंही मार्गदर्शक सूचना केल्यायत. त्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली.