उंदराला मारल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडी

उत्तर प्रदेशातील बदायूं मध्ये एका व्यक्तीला उंदराला पाण्यात बुडवून मारल्याप्रकरणी 10 तास पोलिस कोठडीत राहावे लागले.

मनोज कुमार असे आरोपीचे नाव आहे. त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तथापि, मंडळ अधिकारी आलोक मिश्रा म्हणाले की, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा या प्रकरणात लागू होत नाही, कारण उंदीर प्राण्यांच्या श्रेणीत येत नाहीत. याबाबत आम्ही कायदेशीर अभिप्राय मागवला असून त्यानुसार कारवाई केली जाईल, असे मंडळ अधिकारी म्हणाले.अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितले की, प्राणी कार्यकर्ते विकेंद्र शर्मा यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. विकेंद्रने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने शेपटीला दगड बांधून उंदरावर अत्याचार केल्याचे आणि नाल्याच्या पाण्यात बुडवल्याचे मी पाहिले. आरोपी मनोज कुमारला विचारले असता त्याने हे कृत्य पुन्हा करणार असल्याचे उत्तर दिले. उंदराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश मिळू शकले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.