MPSC : संयुक्त चाळणी परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शुक्रवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी नियोजित विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, सहायक प्रशासकीय अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी या सहा संवर्गासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त चाळणी परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या  https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिव, (दक्षता, धोरण व संशोधन ) यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोडकरुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact – secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेलवर अथवा १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.