आणि आज रेडे देवीला नवस बोलायले गेलेत: संजय राऊत

मुंबई ::” आणि आज रेडे देवीला नवस बोलायले गेलेत, अरे महाराष्ट्रातील देव संपलेत का? सर्वात मोठी देवता या बुलढाणा जिल्ह्यात आहेत, राष्ट्रमाता जिजाबाईंचं मंदीर, रेणुकादेवींचं मंदीर आहे”, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाते फायरब्रॅंड नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर टीका केली.

बुलडाण्यातील चिखलीत शिवसेना ठाकरे गटाच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान संजय राऊत बोलत होते. राज्यात काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिंदे गटाने बंडखोरी करत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. तेव्हा गुवाहाटी हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलं होतं. शिंदे गटाने तेव्हा गुवाहाटीतील कामाख्या देवीला नवस केला होता. आता सत्तेत आल्यानंतर शिंदे गट गुवाहाटीत हा नवस फेडण्यासाठी दाखल झाला आहे.राऊत काय म्हणाले?”सर्वात मोठी देवता बुलढाणा जिल्ह्यात आहेत, राष्ट्रमाता जिजाबाईंचं मंदीर, रेणुकादेवींचं मंदीर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, आणि रेडे गेले गुवाहाटीला. हा महाराष्ट्र संताचा आहे. शेजारी शेगाव आहे. हा संताचा महाराष्ट्र आहे. आमच्याकडे ज्ञानेशवर महाराजांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले. आणि मुख्यमंत्री 40 रेड्यांचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेले”, असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.