शाळेसाठी पायपीट करणाऱ्या गरजू मुलींना सह्यगिरीच्या वतीने सायकल वितरण

गगनबावडा प्रतिनिधी :दिगंबर म्हाळुंगेकर

शालेय शिक्षण घेत असताना सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी मुलींना शाळेसाठी पायपीट करावे लागते, अशा मुलींची गरज ओळखून सह्यगिरी संस्थेच्या च्यावतीने नवीन सायकल वितरित करून मुलींची शाळेसाठी होणारी पायपीट थांबवली .

गेल्या वर्षी सायकल रिसायकल उपक्रमातून ही योजना सुरू केली होती . या वर्षी सर्जेराव शिंदे यांच्या प्रेरणेतून १० मुलींना नवीन सायकली वाटप करण्यात आल्या वेतवडे येथे संपन्न झालेल्या सायकल वितरण कार्यक्रमास गगनबावडा तालुक्याचे माजी सभापती एकनाथ महादेव शिंदे सह्यगिरी परिवाराचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे ,कार्याध्यक्ष तानाजी तेली ,क्रांतिसिंह सावंत ,मनीष नायसे , संजय कांबळे मुख्याध्यापक .संभाजी कांबळे ,चौगुले सर याचबरोबर वेतवडे गावातील उपसरपंच जयसिंग शिंदे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय आडाव ,सेवा संस्थेचे उपाध्यक्ष नामदेव शिंदे ,सचिव आनंदा गुंजवटे ,सामाजिक कार्यकर्ते एम पी शिंदे अशोकराव शिंदे, सिताराम शिंदे,शिवाजी विठ्ठल शिंदे, महादेव कांबळे, पांडुरंग शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .

News Marathi Content