बोम्मईनचे वक्तव्य ही भाजपची स्क्रिप्ट ; संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप..

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे.

राज्यपालांकडून झालेल्या शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे टाकण्यासाठी हा मुद्दा भाजप पुढे आणत आहे.देशातील कोणतेही भाजप पक्षाचे मुख्यमंत्री असं बोलत नाहीत. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. मात्र, लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ही स्क्रिप्ट दिली गेली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.देशातील कोणतेही भाजप पक्षाचे मुख्यमंत्री असं बोलत नाहीत. बोम्मईंचं वक्तव्य हे ठरवलेली स्क्रिप्ट आहे, असा दावा राऊतांनी केला राऊत पुढे म्हणाले, की ही बोंब मारण्यामागे कारस्थान आहे. अन्यथा बोम्मई असं बोलूच शकत नाही. महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पाडण्यासाठी हे केलं जात आहे.