कोल्हापुरात युवकाचा खून

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वडणगे फाट्याजवळ गळ्यावर धारदार चाकूने वार करून युवकाचा खून झाल्याची घटना आज (बुधवारी) घडली आहे. किरण दळवी-नाईक असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील रहिवाशी आहे.

किरण दळवी-नाईक याचा निर्घृण खून करून सुरज आडसुळ (रा.निगवे दुमाला, ता.करवीर)  हा स्वतःहून करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. अनैतिक संबंध तसेच आर्थिक वादातून हा खून झाल्याचा अंदाज पोलीसांकडून वर्तवण्यात आला.