म्हणुनचं कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध पितात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दुध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं कारण काय आहे ते जाणून घ्या.

कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते. यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. वातावरणात बदल होतं असतात. अशावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. ही ताकद म्हणजे कॅल्शिअम आपल्याचा दुधातून मिळते. यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार, कोजागिरी पौर्णिमेला दुध किंवा दूग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याची पद्धत आहे. याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याचे दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात. हे आरोग्यासाठी अतिशय लाभदाक असतं. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध, खीर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात.

चंद्राच्या प्रकाशात मसाला दुध ठेवण्याचं कारण

आयुर्वेदानुसार, चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चंद्रप्रकाशात दुध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा, यासाठी चंद्राच्या प्रकाशात दुध ठेवून नंतर याचं सेवन केलं जातं.