शहरातील जेष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी

कोल्हापूर प्रतिनिधी : महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व जेष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.महापालिकेच्या सावित्रीबाई फुले,श्री पंचगंगा, आयसोलेशन तसेच ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात ही तपासणी करण्यात येणार आहे.

 दि.१९ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सकाळी ९ ते २ या वेळेत ही तपासणी करण्यात येणार आहे. शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत सर्व जेष्ठ नागरीकांच्या आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर दि.१ऑक्टोंबर २०२२ रोजी जेष्ठ नागरीक दिनानिमित्त महापालिकेच्या हॉस्पीटलमध्ये विशेष जेष्ठ नागरीक आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व जेष्ठ नागरीकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.