शहरामधील जनावरांचे लसीकरण पूर्ण

कोल्हापूर प्रतिनिधी : संपूर्ण शहरामधील भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शहरामध्ये १२९७ भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये भटक्या १३३ जनावरांना लस देऊन त्यांना विशेष अशी लाल रंगाची खूण करण्यात आली.

लम्पी स्कीन डिसीज हा गाय वर्गीय जनावरांमध्ये म्हणजेच गाय, वासरू व बैल या जनावरांना संक्रमित झालेला आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य व महापालिका  यांच्यामार्फत शहरातील सर्व गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील संपूर्ण लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी महापालिका व पशुसंवर्धन विभागामार्फत शहरामध्ये पाच टिम तयार करण्यात आल्या होत्या.

या लसीकरणासाठी कोल्हापूर पशुसंवर्धन विभागाचे डॉ. रवींद्र वडगावे, डॉ. किरण उनवणे, डॉ प्रविण नाईक व महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील व कर्मचा-यांनी केले आहे. तसेच शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांची जनावरे पाणवट ठिकाणी, रस्त्यावर अथवा चरण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सोडू नये. त्याचबरोबर अजूनही कोणाच्या गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी 9766532051 या नंबरवर शहरातील नागरिकांचे नाव, पत्ता व जनावरांची संख्या वॉटस्अप करावी.