मुंबई वृत्तसंस्था : भारतात 5G लाँच कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑक्टोबर रोजी 5G सेवा लाँच करू शकतात अशी एक्स्क्लुझिव्ह माहिती CNBC आवाजला देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात साधारण १३ शहरांमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांना 5G सेवा वापरण्यासाठी मिळू शकते. रिलायन्स जिओने मेट्रो शहरांमध्ये दिवाळीपर्यंत 5G सेवा उपलब्ध करून देऊ असं ग्राहकांना आश्वासन दिलं आहे.
एअरटेल आणि जिओ दोन कंपन्यांना 5G लाँच करण्याची परवानगी मिळाली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये पहिल्यांदा 5G सेवा सुरू होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. भारतात एअरटेलचीही 5G सेवा लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. वाराणसी, दिल्ली, बंगळुरू इथे पहिली एअरटेल सेवा सुरू होऊ शकते. तर वोडाफोन आयडिया कंपनी देखील 5G सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र ही सेवा ठरावीक शहरांमध्ये सुरू केली जाण्याची शक्यता आहे.