रेपो रेटमध्ये वाढ, कर्ज महागणार !

नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असतानाच आरबीआयने आज रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. रेपो रेट मध्ये 50 पॉईंटने वाढ झाल्याने तो आता 5.4% झाला आहे. आधीच महागाई वाढत असताना आता कर्जाचा हप्ता देखील वाढत असल्याने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार असल्याचं चित्र आहे.

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते.

🤙 8080365706