पराभवाच्या भीतीने सत्ताधारी चुळबुळले : संभाजी खोचरे

कोल्हापूर : जिल्ह्यातील साडेआठ हजार शिक्षकांच्या  मालकीची कोजिमाशि गेली काही वर्षे केवळ एका सेवानिवृत्त तज्ञ संचालकाच्या नियंत्रणात आहे. सहकारी संस्थांच्या विकासाला हे मारक असल्याने  सभासदांनीच आता सत्तांतर घडवण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तांतरानंतर कोजिमाशि सर्व सभासदांच्या मालकीची होणार असून पराभवाच्या भीतीने आता सत्ताधारी चुळबुळले असल्याचे प्रतिपादन माजी सभापती संभाजी खोचरे यांनी केले.

कळंबा येथे राजर्षी शाहू लोकशाही आघाडीच्या झालेल्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर. डी. पाटील होते. प्रा. विनय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

खोचरे यांनी याप्रसंगी सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न विचारले. संस्थेचे स्व भांडवल वाढविण्याकडे का दुर्लक्ष केले? राखीव निधीमध्ये नफ्यातून आवश्यक प्रमाणात गुंतवणूक का केली नाही ? इमारत निधीमध्ये पुरेशी शिल्लक नसताना राखीव निधीतून रक्कम घेऊन एकाच वर्षी अनेक शाखांसाठी इमारती खरेदी करण्याची गरज होती काय? त्यामुळे संस्था अडचणीत आली त्याला जबाबदार कोण ? लेखापरीक्षणाचे काम वारंवार एकाच सीएकडे का दिले जाते? पीएमसी बँकेतील तब्बल साडेआठ कोटी रुपयांच्या बुडीत ठेवींना जबाबदार कोण ?

यावेळी उमेदवार विनोद उत्तेकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा पंचनामा कागदपत्रांच्या पुराव्यासह सादर केला.

यावेळी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनीही आपली या निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली. आर. डी. पाटील, प्राचार्य सूर्यकांत चव्हाण, सयाजी पाटील नागोजी पाटील, आर. बी. पाटील, विलास  शिंदे, क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी सूर्यवंशी आदींची भाषणे झाली. यावेळी उदय पाटील, के. के. पाटील, संजय पाटील, विलास आसगावकर, सुरेश जाधव, दत्तात्रय जाधव, प्रदीप जगताप, अंजली जाधव, सुनीता कलागते, सुदेश जाधव,  मनोहर जाधव, प्रशांत पोवार, चोरमारे, पंडित पोवार, जगताप, कोरे, क्रीडा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य आर.डी. पाटील, एस. व्ही. सूर्यवंशी, राजेंद्र पोवार, आर. बी पाटील, संदीप पाथरे, संदीप पाटील, प्रदीप साळोखे, अमोल नगारे, संताजी भोसले, आर.व्ही. हलके, अमित शिंत्रे आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. महेश सूर्यवंशी यांनी आभार मानले.

शाळांमध्ये भांडणे लावणारे हे कसले नेते ?

 सयाजी पाटील यांनी उमेदवारीवरून आलेले अनुभव कथन केले. ते म्हणाले,”उमेदवारी देणे जमलेच नाही. उलट आमच्या व इतर संस्थांमध्ये तसेच शाळा शाळांमध्ये उमेदवारीवरून गैरसमज पसरवून भांडणे लावण्याचा उद्योग करणाऱ्या शिक्षक नेत्यांना असले कृत्य शोभा देणारे नसल्याचे सांगितले.