जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी नारा प्रदेशातील प्रचार कार्यक्रमात दोनदा गोळी लागल्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आबे, जपानचे सर्वाधिक काळ सेवा करणारे नेते, पश्चिम जपानमधील नारा येथे संसदीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोळी लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पश्चिम जपानमध्ये नारा शहरात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं भाषण सुरु होतं. यावेळी ते अचानक खाली कोसळले. त्यावेळी शिंजो आबे जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आलं. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. 

दरम्यान 2016 मध्ये जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठं यश मिळालं होतं. त्यावेळी भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार झाला होता. या करारामुळे दोन्ही देशांतील अणुऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील भागीदारीसाठी मार्ग मोकळा झाला होता. यावेळी भारत-जपानमध्ये इतर नऊ करारांवरदेखील स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी पद्मविभूषण पुरस्काराने जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना सन्मानित करण्यात आले होते.