जाकीट घालून मिरवणाऱ्या फुटीर संचालकाने मानसोपचार तज्ञांकडे उपचार घ्यावेत : राजेंद्र रानमाळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला व भुदरगड तालुक्याचा रहिवाशी असलेल्या स्वयंघोषित नेत्याची मानसिक स्थिती बिघडली असून या परिस्थितीतून त्यांनी स्वतःला सांभाळावे, मानसोपचार तज्ञांकडे उपचार घ्यावेत अन्यथा ते कायमचे कोम्यात जातील, असा इशारा ‘कोजिमाशी’चे माजी चेअरमन राजेंद्र रानमाळे यांनी दिला.

कोजिमाशि निवडणूकीसाठी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या ते भुदरगड तालुक्यातील सभासद मेळाव्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष जी. बी. खांडेकर होते. याप्रसंगी निवडणूकीतील माघार घेतलेले शांताराम तौंदकर,  निशिकांत चव्हाण, विजय कोटकर, शर्मिला पाटील, एन. एस. पाटील आदींचा सत्कार शिक्षक नेते दादा लाड यांच्या हस्ते करण्यात आला.

रानमाळे म्हणाले, जाकिट घालून गावातील लोकांना (जे सभासद नाहीत) त्यांना स्वतःला मेळाव्याच्या ठिकाणी खांद्यावर घ्यायला सांगून नाचत गाजत स्टेजपर्यंत आणायला सांगत आहे. स्वतःला मोठा नेता समजत आहे. ज्याला स्वतःच्या शाळेतून विरोध असणारा व दररोज नेत्यांच्या सोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करुन प्रसिध्दीस हापपलेला माजी चेअरमन बेताल वक्तव्य करून शिक्षक नेते दादा लाड यांच्यावर वैयक्तिक टीका टीपण्णी करीत आहे. त्यांनी आत्मचिंतन करावे की ज्या नेत्यांनी आपणास सभापतीपदी विराजमान केले त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचे सोडून हा माणूस कृतघ्न झाला आहे.

राजेंद्र रानमाळे पुढे म्हणाले की, दादा लाड यांनी त्यांचा एक जवळचा विश्वासू म्हणून त्यांच्या सभापती पदाचे नाव घोषित केले होते. त्यावेळी आम्हांला रात्रभर झोप लागली नाही. आम्ही सर्वजण मनस्वी दुःखी होतो. मात्र दादा लाड यांचा शब्द प्रमाण मानणारे आम्ही सर्व संचालक आहोत. राक्षसी वृत्तीची महत्त्वकांक्षी असणारा या विश्वासघातकी माणसाला आम्ही सर्वजणांनी सभापतीपदी बसविले तोच विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसतो आहे याची आम्हांला खंत वाटत आहे.

   या प्रसंगी बोलतांना शिक्षक नेते दादा लाड यांनी  कोजिमाशिचे संस्थापक कै. शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील आणि कै. श्रीमती सुशिलाताई कुलकर्णी यांचे फोटो मुख्य कार्यालयाच्या सभागृहामध्ये लावणार असल्याचे जाहीर केले. याचे कारण म्हणजे आम्ही डी. बी. पाटील सरांचे रक्ताचे वारस नसलो तर विचारांचे वारस आहोत. येत्या निवडणूकीत स्वाभिमानी सहकारी आघाडीतील २१ उमेदवारांना कपबशी चिन्हावर शिक्का मारून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन या मेळावा प्रसंगी केले.

     डॉ. ए. एम. पाटील म्हणाले, दादा लाड यांनी कोजिमाशि पतसंस्थेत १८ वर्षाच्या कार्यकाळात सभासदांच्या हिताचे कार्य करून सभासदाभिमुख योजनांचा पाऊस पाडला आहे. जेष्ठ शिक्षणतज्ञ  डी.बी. पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा वसा पुढे शिक्षक नेते दादा लाड यांनी चालवावा. आपल्या नेतृत्वाखाली जशी कोजिमाशि पतसंस्था सर्वोच्च कार्याने नावलौकिकास पात्र अशी चालविली आहे. त्या पद्धतीने पुढील काळात मुख्याध्यापक संघाचेही नेतृत्व त्यांनी करावे.

    कोजिमाशि संचालक शांताराम तौंदकर म्हणाले, भुदरगड तालुक्यातील कोजिमाशि सभासदांचा शिक्षक नेते दादा लाड यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही पात्र राहून कार्य केले आहे. या तालुक्यातील एक गोडबोला जो मुख्याध्यापक संघात मागील दरवाजातून आत गेला आहे. त्यास जिल्ह्याचा नेता होण्याची स्वप्ने पडली आहेत. तसेच जवळचा मित्र साडे सात वर्षे माझ्या गाडीतून फिरणारा माजी चेअरमन या दोघांना जिल्ह्यात पदांच्या मध्यमातून  शिक्षक नेते दादा लाड यांनी

ओळख दिली. तेच त्यांचावर बेताल वक्तव्य करीत विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत हे त्यांना अशोभनिय आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी त्यांनी गारगोटीतील  क्रांती चौकात यावे मी उत्तरे देण्यासाठी सज्ज आहे. तुमची सर्व काळ्या कर्तृत्वाची फाईल माझ्याकडे आहे. या पुढे आमचे नेते दादा लाड यांच्या बद्दल अपशब्द काढल्यास स्वाभिमानी सभासद जशास तसे उत्तर दिल्या शिवाय राहणार नाहीत. असा सज्जड दम शांताराम तौंदकर यांनी विरोधकांना दिला.

    या प्रसंगी चेअरमन बाळ डेळेकर जी.बी. खांडेकर, डॉ. ए. एम. पाटील, डॉ. डी. एस. घुगरे, निशिकांत चव्हाण, गजानन चव्हाण, मारुती लाड, बजरंग कुरळे, शरद पाडळकर, एम. आर. पाटील एन. एस. पाटील आदी मान्यवरांसह भुदरगड तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पांडूरंग हाळदरकर यांनी केले तर आभार निशिकांत चव्हाण यांनी मानले.