नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण तेल कंपन्यांनी पुन्हा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरसोबतच कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली असताना आता पुन्हा एकदा गॅस महागला आहे. मुंबईसह दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यानुसार, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसंच, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 8 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील 12 दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत दरवाढ करण्यात आली आहे. याआधी 7 मे रोजी गॅस सिलिंदरची 50 रुपयांची दरवाढ करण्यात आलेली. आता गेल्या 12 दिवसांत तब्बल 53.50 रुपयांनी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत.