क्रीडाई कोल्हापूरच्यावतीने बांधकाम विषयक ‘दालन २०२२’ प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन

कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा व घटकांची एकत्र माहिती देणाऱ्या क्रीडाई-कोल्हापूर आयोजित. ‘दालन २०२२’ प्रदर्शनाचा प्रारंभ उद्या, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शाहूपुरी जिमखाना मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आहेत. यावेळी खासदार संजय मंडलिक, संभाजीराजें छत्रपती, आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनात १६० संस्था सहभागी होणार असून, यात वन बीएचके ते हाऊस, रो-बंगलो ते सेकंड होमपर्यंतच्या गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. स्थानिकांसह सांगली, सातारा, बेळगांव, कोकण, गोव्यातील नागरिकांसाठीही हे प्रदर्शन पर्वणी ठरेल. खास कोल्हापुरी ते दाक्षिणात्य खाद्यपदार्थांच्या स्टॉलचीही मेजवानी आहे. या प्रदर्शनाचे प्लॅटिनम प्रायोजक महालक्ष्मी टीएमटी बार असून कजारिया टाईल्स व शिंडलर लिफ्टस् हे गोल्ड प्रायोजक आहेत. बँकांसह वित्तीय संस्थाही सहभागी होणार असून ग्राहकांना कमी कागदपत्रात अर्थसहाय्य उपलब्ध करणार आहेत.

 दालन २०२२’ प्रदर्शनाच्या नियोजनासाठी क्रीडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव प्रदीप भारमल यांच्यासह खाजानिस गौतम परमार, दालन उपाध्यक्ष अजय डोईजड, सचिव सोमराज देशमुख, खजिनदार संदीप मिरजकर, श्रीधर कुलकर्णी, निखिल शहा, पवन जामदार, स्टॉल समिती प्रमुख संदीप पवार, जनसंपर्क समिती प्रमुख विक्रांत जाधव, आदरातिथ्य समिती प्रमुख संग्राम दळवी, संग्राम पाटील, रवी माने, गंधार डिग्रजकर आदी परिश्रम घेत आहेत.

🤙 9921334545