पंचगंगा स्मशानभुमीतील पेटीत पाच लाखाचे दान

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी पालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. याठिकाणी  गुप्तदान पेट्या  ठेवण्यात  आल्या आहेत. पंचगंगा स्मशानभूमीतील पेटीत नागरिकांनी पाच लाखाचे दान टाकले आहे.

   स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षा विर्सजनासाठी येणारे नागरिक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात या पेट्या दरवर्षी मार्च अखेरीस उघडल्या जातात. 

पंचगंगा स्मशानभूमीतील गुप्तदान पेटी सोमवारी सहायक आयुक्त संदीप घार्गे, मुख्य आरोग्य निरीक्षक  जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, मुख्य लेखापरिक्षक विभागाचेअजित टिटवेकर  यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. या दानपेटीमध्ये रु. 4,95,317 इतकी रक्कम व चार चांदीची जोडवी जमा झालेली आहे.

यापुर्वी माहे जुन 2021 मध्येस्मशानभूमीकडील दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. यानंतर 10 महिन्यात पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल रु.4,95,317  इतकी रक्कम दान स्वरुपात दानपेटीत प्राप्त झालेली आहे. स्मशानभूमीसाठी दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, नागरिक यांचेकडून शेणी, लाकूड दान करणेस मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर दानपेटीतही प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे.

🤙 8080365706