हिंदूत्ववादी संघटनांचा भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना एकमुखी पाठिंबा

   कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर पूर्ण विश्‍वास आहे. केवळ भाजपनेच हिंदूत्वाची धारा टिकवली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत तमाम हिंदूत्ववादी संघटनांचा भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना एकमुखी पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले.

 अयोध्येत वेगाने राम मंदिर उभारले जात आहे. काश्मिरमधील कलम ३७० रद्द करण्यात आले. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उज्वल केली आहे. एका बाजूला कॉंग्रेसचे हास्यास्पद आणि बालिश नेतृत्व, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्यासारखे दुरदृष्टीचे प्रगल्भ नेतृत्व असा विरोधाभास आहे. त्यामुळेच मोदींशिवाय पर्याय नाही, हे प्रत्येक भारतीय जाणून आहे. महाराष्ट्रातही भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारचे दिवस भरले आहेत. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे विविध हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी सांगितले. हिंदू एकता आंदोलन,  पतित पावन संघटना,  हिंदू सेवा संघ,  हिंदू महासभा,  सेवाव्रत प्रतिष्ठान या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी नाना कदम यांना पाठिंबा जाहीर केला.

यावेळी संजय साडविलकर,  महेश उरसाल, गजानन तोडकर,  मनोहर सोरप,  सुनिल पाटील,  बापू वडगावकर, उदय भोसले,  नंदू घोरपडे, दिपाली खाडे,  दिलीप सुर्यवंशी,  विशाल शिराळकर आणि धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.