कोल्हापूर : महागाईचा आगडोंब उडाला असून गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असतानाच आता टोलधाडीची त्यात भर पडणार आहे. १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाने वाढीव टोल दर लागू करण्यास परवानगी दिल्याने हा सर्वसामान्य जनतेला आणखी एक मोठा झटका असून उद्या १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवणे महाग होणार आहे.
राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर टक्के ते १५ टक्के जास्त टोल भरावा लागणार आहे. छोट्या वाहनांना १० ते १५ रुपये तर अवजड वाहनासाठी ६५ रुपये जादाचा टोल भरावा लागणार आहे.