नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. या आठवड्यात चौथ्यांदा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आजही सरकारी तेल कंपन्यांनी देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ केली आहे. पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल ३.२० रुपयांनी महागले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. भारतात गेल्या पाच दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चार वेळा दरवाढ केल्यामूळे जनता त्रस्त झाली आहे. तेलाच्या किमतीत झालेल्या ताज्या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ११३ रुपये ३५ पैसे आणि डिझेलचा दर ९७ रुपये ५५ पैसे लिटर झाला आहे.