कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीमती जाधव यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्याकडे दाखल केला.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,  सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार मालोजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महाविकास आघाडी, व मित्रपक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.