राजकारणातील हुकुमशाहीला धक्का देण्यासाठीच’ कोल्हापूर उत्तर’ च्या मैदानात : हाजी असलम सैय्यद

कोल्हापूर : राजकारणात मी म्हणेन तीच पूर्वदिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुक़ूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरल्याची घोषणा हाजी असलम सैय्यद यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत बोलताना केली. ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत हातकनंगले लोकसभा मतदार संघातुन हाजी असलम सैय्यद बहुजन वंचित आघाडी मार्फ़त निवडणूक लढले होते. तत्कालीन खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना त्यानी कड़वी झुंज दिली होती. या निवडणुकीत त्यांना दीड लाखाच्या आसपास मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या मतामुळेच राजू शेट्टी यांना पराभूत व्हावे लागले होते. हा मतदारसंघ हाजी अस्लम यांच्यासाठी नवीनच होता. शिवाय कमी कालावधी मिळाल्याने त्यांना ७२२ गावापैकी केवळ १०० गावापर्यंतच आपला प्रचार करता आला होता. तरीही त्यानी लक्षणीय मते घेतल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यानी वेधुन घेतले होते.गेमचेंजर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात हाजी अस्लम यांचा रहिवास आहे. शिवाय मतदारसंघ छोटा आहे.प्रभावी जनसंपर्क असल्याने या पोटनिवडणुकीत आपली लढत पुन्हा एकदा करिश्मा दाखवेल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. हुक़ूमशाही प्रवृत्तीला वैतागलेले मतदार अपल्यालाच कौल देतील, असा आत्मविश्वास त्यानी शेवटी बोलताना व्यक्त केला. मतमोजणीनंतर जनतेच्या मनातल्या भावना उघड़ होतील, असा दावा त्यानी केला.