जलसाक्षरता आणि व्यवस्थापन ही काळाची गरज : डॉ. व्ही. एन. शिंदे

कोल्हापूर : जलसाक्षरता आणि व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररी हॉलमध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी पुणे (यशदा) आणि शिवाजी विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलसेवक पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निसर्गमित्र अनिल चौगुले होते.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, निसर्ग मित्र अनिल चौगुले, शिवाजी विद्यापीठातील भूगोल शास्त्र विभागाचे डॉ. संभाजी शिंदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी उपकुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, अण्णा हवा आणि पाणी या मानवाच्या गरजा बनल्या असून यापुढील काळात पाण्याचे महत्त्व हे सर्वांनी ओळखले पाहिजे.
पर्यावरण तज्ञ संदीप जोडणकर म्हणाले,
नदीचे आरोग्य उत्तम राहिले तरच आपले शरीर तंदुरुस्त राहिल. गजानन महाजन म्हणाले, नदी स्वच्छता मोहिमेसाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रा. नेताजी पाटील म्हणाले, पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापनातून जलव्यवस्थापन करून शेतीच्या उत्पन्नात वाढ केली पाहिजे.

सुत्रसंचलन निसर्ग मित्र अनिल चौगुले यांनी केले. प्रास्ताविक जयश्री दिवे यांनी केले तर आभार डॉ. संभाजी शिंदे यांनी मानले. दरम्यान, शिवाजी विद्यापीठ परिसरातील जलस्त्रोतांची माहिती घेण्यासाठी परिसर भेट उपक्रम राबवण्यात आला.