…अनं जयश्री जाधव झाल्या भावुक

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (रविवारी) पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. केशवराव भोसले नाट्यगृहात हा मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज पाटील,शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

दरम्यान, स्वर्गीय आ.चंद्रकांत जाधव यांना गाण्याच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच आ.जाधव यांनी केलेल्या कार्याच्या व्हिडिओचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी श्रीमती जयश्री जाधव या चंद्रकांत जाधव यांच्या आठवणीने गहिवरल्या, भावुक झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन ऑफ इंडियाचे जिल्ह्याध्यक्ष डी.जी.भास्कर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार,राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर.के.पवार, आ.जयंत आसगावकर,भारती पवार, आ.ऋतुराज पाटील, आ. राजूबाबा आवळे,खा.धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.