जयश्री जाधव यांचा विजय निश्चित ; महाविकास आघाडीच्या मेळाव्यात निर्धार

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (रविवारी) पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. केशवराव भोसले नाट्यगृहात हा मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज पाटील,शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव याचं विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान,महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव, पीपल्स रिपब्लिकन ऑफ इंडियाचे जिल्ह्याध्यक्ष डी.जी.भास्कर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार,राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर.के.पवार, आ.जयंत आसगावकर,भारती पवार, आ.ऋतुराज पाटील, आ.राजूबाबा आवळे,खा.धैर्यशील माने यांनी मनोगते व्यक्त केले.

या मेळाव्यास महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.