कोल्हापूर : केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत १-० अशा गोलफरकाने खंडोबा तालीम मंडळाचा पराभव करत बालगोपाल तालीम मंडळाने विजयी आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने खंडोबा तालीम अ वर १-० गोलने विजय मिळवला.
केएसए लीग स्पर्धेतील आज, शुक्रवारी झालेला सामना केएसए लीग व खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यात खेळवण्यात आला. विजयी बालगोपाल तालीम मंडळाकडून अभिनव साळोखे याने गोलची नोंद केली. खंडोबाकडून शेवटच्या क्षणापर्यंत गोल बरोबरी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. पण त्यांना यश आले नाही.