कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस की शिवसेनेला सोडायचा याबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. अखेर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीअंतर्गत घेण्यात आला आहे.शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता काँग्रेस विरूध्द भाजप अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बालेकिल्ला असल्याने शिवसेनेने या ठिकाणी काँग्रेससह मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह धरला होता. दरम्यान, शिवसेनेच्या या माघारीचा काँग्रेसला फायदा होतो की, भाजपला हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.