शेतकरी संघटनेचे राजेश नाईक मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार


कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दि. २२ मार्चला दाखल करण्यात येणार आहे.

मंगळवारी सकाळी दहा वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी व चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी व उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधूनी आपले उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांच्या रुईकर कॉलनी येथील नाईक मसाले यांच्या कार्यालयात रविवारी दि. २० मार्चला दुपारी बारा वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे, संपर्क प्रमुख व संपर्क प्रमुख उत्तम पाटील यांनी केले आहे.