भाजपचा विजय म्हणजे काँग्रेस संपल्याचे द्योतक : एजाज देशमुख

कोल्हापूर : गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. याऊलट भाजपने सबका साथ, सबका विकास ही भूमिका घेतली म्हणूनच सलग दुसऱ्या वेळी देशातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मतदार संख्येने जास्त असूनही भाजपाला २७४ जागी विजय मिळाला. देशामधून काँग्रेस संपल्याचे यातून स्पष्ट दिसते, असे प्रतिपादन भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांनी केले.     

    भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कोल्हापुरात जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हॉटेल जोतिबा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे हे होते. अल्पसंख्यांक मोर्चाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तबस्सुम बैरागदार, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाशा मुल्ला,  भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव,  राजारामपुरी मंडल अध्यक्ष रवींद्र मुतगी, मंडल चिटणीस दिलीप मैत्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.                         

   एजाज देशमुख म्हणाले, भाजपचे सरकार असताना अल्पसंख्यांक समुदायातील अनेक नेत्यांना विविध महामंडळ आणि सरकारी समित्यावर काम करण्याची संधी मिळाली. परन्तु महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाच महामंडळ अद्याप रिक्त आहेत.

  यावेळी तबस्सुम बैरागदार, राहुल चिकोडे, रवींद्र मुतगी,  दिलीप मैत्राणी यानी मनोगत व्यक्त केले. १७ पेक्षा अधिक वेळ हज यात्रा केल्याबददल हाजी एजाज देशमुख यांचा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आजम जमादार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस शाहरुख गढ़वाले यानी सूत्रसंचालन केले. प्रभाकर हिंदोड़े यानी आभार मानले. या बैठकीचे संयोजन आजम ज्मादार, महालक्ष्मी सखी मंचच्या अध्यक्षा सौ जस्मिन जमादार, सौ सुषमा गर्दे,  झांकिर जमादार,  फैयाज अथणीकर, उदय जाधव, अय्यान जमादार ,सादिक जमादार, आयाज शेख, उमेश जाधव, सागर केंगाने,  नाजीम अत्तार, अभिषेक पाटील, आदींनी केले.