इचलकरंजी (प्रतिनिधी) : मराठी चित्रपसृष्टीचा इतिहास असलेला जयप्रभा स्टुडिओ म्हणजे कोल्हापूरची अस्मिता ही वाचलीच पाहिजे या मागणीसाठी इचलकरंजी कलाकार संघाच्यावतीने इचलकरंजी ते कोल्हापूर येथे बाईक रॅली काढून कोल्हापुरात सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात येणार आहे.
या स्टुडिओचे अस्तित्व संपविण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि कोल्हापूरची अस्मिता असलेल्या स्टुडिओचे अस्तित्व अबाधित राहावे याकरिता तीव्र संघर्ष सुरू झाला. याचाच भाग म्हणून इचलकरंजी आणि परिसरातील कलाकारांनी इचलकरंजी ते जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर अशा बाईक रॅलीचे २० मार्च रोजी सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले आहे. घोरपडे नाट्यगृह पासून निघणाऱ्या या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शहर व परिसरातील कलाकार उपस्थित होते.