पोलिसांनी केला पोलिस चौकीचाच बियरबार

नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दादोजी कोंडदेवनगर पोलिस चौकीतच ड्युटीवर पोलिस कर्मचाऱ्यांनी दारूची झिंगाट पार्टी करून पोलिस चौकीचाच बियरबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना चौकीतच मारहाण केली.

 याबाबत अधिक माहिती अशी, नाशिकच्या दादोजी कोंडदेवनगर पोलिस चौकीतच ड्युटीवर पोलिस कर्मचाऱ्यांनी दारूची झिंगाट पार्टी रंगली होती. यावेळी टवाळखोरांवर कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार देण्यासाठी सख्खे बंधू पोलिस चौकीत आले होते. यावेळी पोलिस चौकीतच चौकीतच टेबलवर मद्याने भरलेले ग्लास व तेथे बसलेले पोलीस होते. आपल्या पार्टीचा भांडाफोड झाल्याच्या रागातून मद्यपी पोलिसांनी तक्रारदार बंधूंना पोलिस चौकीतील लाईट बंद मारहाण केली. शिंदे बंधूनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने चौकीसमोर जमा झाले. जमलेला जमाव पाहून त्या पाच पोलिसांनी पोलिस चौकीतून पोबारा केला. मद्यपी पाच पोलिसांपैकी एकाला रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. बाकी चौघे पसार झाले होते.