हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी ३५ कोटीचा निधी : धैर्यशील माने

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामधून खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ३५ कोटी ३ लक्ष ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामांना गती दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजुरीसाठी विशेष सहकार्य केल्याचे माने यांनी सांगितले.

    हातकणंगले तालुक्यात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गासाठी १७ कोटी ९९ लक्ष रुपये तर ग्रामिण मार्ग व इतर जिल्हा मार्गासाठी २ कोटी ९५ लक्ष २० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात निढोरी- गौरंबे- कागल- यळगूड- रेंदाळ- रांगोळी- शिरदवाड- लाट- हेरवाड रस्ता. यळगुड ते रेंदाळ, कबनूर इचलकरंजी टाकवडे रस्ता. यळगुड ते रेंदाळ, कबनूर इचलकरंजी टाकवडे, अतिग्रे ते तिळवणी, पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, कबनूर इचलकरंजी टाकवडे रस्ता, हातकणगले, कुंभोज, कवठेसार रस्ता, पेठवडगांव भेंडवडे खोची ते दुधगांव जिल्हा हद्द, इचलकरंजी चंदूर रुई ते हुपरी, निलेवाडी पारगांव, अंबप, वडगांव, हातकणंगले ते रामलिंग रस्ता, खोचो ते बुवाचे वठार, कुंभोज ते बुवाचे वठार, अतिग्रे, रुकडी, माणगांव. माणगांव, माणगांववाडी, इचलकरंजी नाक्यापासून टाकवडे- नांदणी, कोथळी ते दानोळी मराठी शाळा ते जयसिंगपूर, आलास बुबनाळ औरवाड.

   पन्हाळा- शाहूवाडी विधानसभा मतदार संघासाठी ग्रामिण मार्ग व इतर जिल्हा मार्गासाठी २ कोटी रुपये मंजूर असून देवाळे – मौसम सोप्टेवाडी ते गावडी (कुंभवडे मार्ग), वरपेवाडी, करपेवाडी, जाधववाडी, पांढरेपाणी रस्त्यासाठी ३८ लक्ष. गावडी शेंबवणे मांजरे ते चिखलवाड़ी गिरगाव. परळे निनाई.  शिराळा तालुक्यासाठी इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्गासाठी १ कोटी ५२ लक्ष रुपये : कापरी- शेडगेवाडी वाकाईवाडी, लादेवाडी ते ठाणापुडे. वाळवा तालुक्यातील पडवळवाडी बावची, शिगांव प्रजिमा ११ रस्त्यासाठी ७ कोटी १२ लक्ष ५० हजार रूपये.