सादळे-मादळे घाटात भीषण अपघातात एक ठार; २२ गंभीर जखमी

कोल्हापूर : सादळे-मादळे घाटात ऊसतोड मजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली दरीत उलटून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर २२ गंभीर जखमी झाले. जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. अशोक शंकर गावडे (वय 55,रा. कोरेगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, याबाबत माहिती अशी, वारणा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊसतोड करणारे शिगाव व कोरेगाव(ता. वाळवा ) येथील मजूर रविवारी कारखान्याचा उसाचा गळीत हंगाम संपवून ट्रॅक्टर ट्रॉलीतून जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन दुपारी गावाकडे परत जात असताना सादळे- मादळे घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये ट्रॉलीतील सर्वजण गंभीर जखमी झाले. एक जणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अशोक शंकर गावडे (वय 55,रा. कोरेगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

सायंकाळी सात वाजता रुग्णवाहिकेतून सर्वांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. जखमी शिगाव व कोरेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील आहेत.