सोने-चांदीचे दर घसरले …

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांच्या तुफान वाढीनंतर आज गुरुवारी सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा जगभरात मोठा परिणाम होत आहे.

रशिया – युक्रेनमधील युद्धामुळे जगभरातील आर्थिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणुकदार जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक टाळत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोठा कल आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने – चांदी दर घसरला असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे. भारतीय सराफा बाजारातही आज दर काहीसा कमी झाला आहे. भारतीय सराफा बाजारात 10 मार्च 2022 रोजी आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदे भाव 0.40 टक्क्यांच्या घरसणीसह 52,532 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. चांदीच्या दरातही 0.25 टक्क्यांची घरसण झाली असून 69,404 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.

रशिया – युक्रेन युद्धाचा परिणाम – युद्धामुळे अनेक गुंतवणुकदारांनी गोल्ड ETF मध्ये मोठी गुंतवणूक केली, त्यामुळे सोने दरात आणखी मजबूती आली आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचं चित्र आहे.