पंजाबमध्ये आपच्या झाडूकडून कॉंग्रेस, भाजपचा सुपडा साफ

चंदीगड : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) जोरदार मुसंडी मारत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु ठेवली आहे. विधानसभेच्या 117 जागा पैकी आपने तब्बल 89 जागांवर आघाडी घेतली आहे. आपने प्रस्थापितांना धक्का देत मोठं यश प्राप्त केलं आहे. आपच्या झाडूने कॉंग्रेस, भाजपचा सुपडा साफ केला आहे.

मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तसंच शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल देखील पिछाडीवर आहेत.. दिल्लीनंतर आम आदमीनं आता पंजाबमध्येही मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे.

 पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. पंजाबमध्ये आतापर्यंत आम आदमी पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप तब्बल 89 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचं सेलिब्रेशन देखील आपनं सुरु केलं आहे. ‘ आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार जल्लोष केला जात आहे .