भारतीय शेयर बाजारात तेजी

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजाराने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या तेजीसह आपला व्यवसाय संपवला. सेन्सेक्स 1,223 अंकांनी चढत 55 हजारांच्या जवळ पोहोचला तर निफ्टी 16,300 च्या वर बंद झाला.आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने मजबूती दाखवायला सुरुवात केली.

गुंतवणूकदारांनी वारंवार केलेल्या खरेदीमुळे दोन्ही एक्सचेंजेसला फायदा झाला. अखेर सेन्सेक्स 1,223.34 अंकांच्या वाढीसह 54,647.33 वर बंद झाला. निफ्टीही 331.90 अंकांच्या वाढीसह 16,345.35 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर्स ग्रीन मार्कवर बंद झाले आहेत.

मेटल वगळता सर्व क्षेत्रांत तेजी दिसून आलीकेवळ एक क्षेत्र सोडले तर बाकी सर्व ग्रीन मार्कवर बंद झाल्याची जोरदार स्थिती बाजारात होती. ऑटो, रियल्टी 2 टक्क्यांपर्यंत वाढली तर मेटलचे शेअर्स घसरले. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपनेही 2 टक्क्यांपर्यंत उसळी दाखवली आहे. निफ्टीचा बँक इंडेक्‍स 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.