महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानतर्फे ‘निर्भया टास्कफोर्स’ची स्थापना

कोल्हापूर : महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानतर्फे महिला सबलीकरण व महिलांवरील अत्याचार या संदर्भात निर्भया टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

    महिला दिनाचे औचित्य साधून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून या फोर्सच्या तीस महिला सदस्य आहेत. या टास्क फोर्स तर्फे महिला सबलीकरण अंतर्गत महिलांना विविध लघुउद्योग काढून देणे, त्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व प्रशिक्षण देणे त्याबरोबरच महिलांवरील अत्याचारासंदर्भात  कायदेशीर मार्गदर्शन करणे व घरगुती समस्यांबद्दल माहिती घेणे आदी कामे केली जाणार आहेत, अशी माहिती अनुराधा कोरे यांनी दिली. या टास्क फोर्समध्ये अँड. भाग्यश्री पाटील, क्रांती कांबळे, पूजा आरडे, प्रेमा मोहिते, अश्विनी जाधव यांचा समावेश आहे.