…मग राज्यपाल लोकशाहीचा गळा घोटत नाहीत का?

मुंबई :  भाजपा आमदार गिरीश महाजन यांना मुंबई हायकोर्टाने फटकारलं आहे. हायकोर्टाने गिरीश महाजन यांची याचिका फेटाळली आहे. गिरीष महाजन यांनी अध्यक्ष निवडीमध्ये नियम बदल केल्याने लोकशाहीचा गळा घोटल्याचे हायकोर्टात म्हणणे मांडले होते. यावर प्रतित्तरादाखल राज्यपालांनी १२ नामनिर्देशित सदस्यांची अद्याप निवड केलेली नाही, मग हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का ? असा प्रश्न कोर्टाने गिरीश महाजनांना विचारला.

विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेवर भाजप आमदार गिरीश महाजन यांनी जनहित याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान दिले होते. सोबतच दोघानी जमा केलेले १२ लाखांची अनामत जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमबदलाने लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असं महाजनांचं म्हणणे आहे. असं असेल तर राज्यपालांनी १२ नामनिर्देशित सदस्यांची अद्याप निवड केलेली नाही, मग हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का? असा प्रश्न कोर्टाने गिरीश महाजनांना विचारला.