बहिरेश्वरला महिला दिनी भजन महोत्सव

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कोटेश्वर महिला भजनी मंडळ व कोल्हापूर जिल्हा लोककला कार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. मंगल दिंडे यांचे अध्यक्षतेखाली कोटेश्वर मंदिर येथे मार्गदर्शन शिबिर व भजन महोत्सव झाला.

 करवीर पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ.अश्विनी धोत्रे सरपंच युवराज दिंडे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील पहिली महिला डॉक्टर व पहिली महिला पोलीस, महिला इंजिनिअर यांना गौरविण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी धोत्रे म्हणाल्या, प्रत्येक महिलेने स्वकर्तृत्वावर आपला संसार उभारला पाहिजे. बचत गट स्थापन करुन आपला उदरनिर्वाह चालवला पाहिजे. शासनामार्फत येणा-या नवनवीन योजनांची माहिती घेत त्याचा जास्तीत जास्त लाभ. यावेळी कुंभी कासारी कारखान्याचे माजी संचालक सिताराम पांडुरंग पाटील, माजी व्हा.चेअरमन शामराव गोदडे, माजी सरपंच सुर्यकांत दिंडे, कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे चेअरमन रघूनाथ वरूटे, उपसरपंच कृष्णात सुतार, ग्रामपंचायत सदस्य प्रा. तानाजी गोदडे तर सुत्रसंचालन व आभार डॉ. सुर्यकांत मोरे यांनी मानले.