आज दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडमध्ये टक्कर होणार….. रेल्वेमंत्री आत असणार

मुंबई : भारतीय रेल्वे  सतत तंत्रज्ञान विकसित करत असते. आजचा दिवस रेल्वेसाठी अत्यंत खास आणि ऐतिहासिक आहे. आज दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडमध्ये टक्कर होणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान एका ट्रेनमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष उपस्थित असणार आहेत.

रेल्वे आज स्वदेशी ट्रेन टक्कर संरक्षण तंत्रज्ञान ‘कवच’ ची चाचणी घेणार आहे. ही चाचणी सिकंदराबाद येथे होणार आहे. यामध्ये दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे येतील.दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने येतील. मात्र, कवचमुळे या दोन गाड्यांमध्ये टक्कर होणार नाहीये.

याबाबतची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. सनथनगर-शंकरपल्ली मार्गावरील प्रणालीच्या ट्रायल रनचा भाग म्हणून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सिकंदराबादला पोहोचणार आहेत. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर रेल्वे मंत्रालयाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. भारतीय रेल्वेने विकसित केलेले हे कवच तंत्रज्ञान जगातील सर्वात स्वस्त स्वयंचलित ट्रेन टक्कर संरक्षण प्रणाली असल्याचे मानले जात आहे.