सितारा फर्निचर्सचा रोटरीकडून गौरव

इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्याकडून व्यवसायासाठीचा (व्होकेशनल) देण्यात येणारा पुरस्कार सितारा फर्निचरला प्रदान करण्यात आला.

 रोटरीचे प्रांतपाल नासीर बोरसादवाला यांच्या हस्ते सितारा फर्निचर्सचे मालक बशीर अत्तार व मन्सूर अत्तार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, नाकोडानगर, इचलकरंजी येथे हा सोहळा झाला. यावेळी सहाय्यक प्रांतपाल सुमती अग्रवाल, नागनाथ बसूदे, बाळासाहेब देवनाळे, माजी अध्यक्ष डॉ. पी. बी. कांबळे तसेच रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष यतिराज भंडारी, सचिव राजू तारदाळे, व्यवसायिक संचालक नितीन शहा आणि रोटरी क्लब ऑफ अतिग्रेचे अध्यक्ष प्रशांत गुरव, सचिव अभिजीत पाटील, व्यवसायिक संचालक सचिन पाटील उपस्थित होते.