राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा
फुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेलअशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले
.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपाल कोश्यारीव भारतीय जनता पक्षाला आवडो वा ना आवडो जयजयकार कोणीही थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज व महात्मा फुले तसेच सावित्रीमाईंबद्दल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.

नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा भाजपाला अधिकार नाही.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील डझनभर मंत्र्यांवर आरोप झाले, त्यावेळी फडणवीस यांनी किती मंत्र्यांचेराजीनामे घेतले? याचे उत्तर द्यावे.