राज्यपालांकडून राष्ट्रगीताचा अवमान : जयंत पाटील

मुंबई : भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच राज्यपाल निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

 पाटील म्हणाले,  महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडली. आम्हीही विरोधी पक्षात होतो पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही. राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत त्यांचे स्वागत केले. मात्र भाजपच्या लोकांनी गोंधळ घातला. फलकं झळकवले त्यामुळे राज्यपाल महोदय राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.