खुपिरेच्या बलभीम संस्थेतील अपहारप्रकरणी माजी संचालकांवर गुन्हा

दोनवडे : खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेतील अपहारप्रकरणी सचिवासह १६ माजी संचालकावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे खुपिरे गावात खळबळ उडाली आहे.

 बलभीम संस्थेची लाखो रुपयांची उलाढाल आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारातील अनियमिता व संचालकांना दिलेले कर्ज तसेच नियमबाह्य सभासद वाढीबाबत सरदार बंगे यांनी सहकार निबंधक यांच्याकडे तक्रार दिली होती. मागील संचालकांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना ९८ लाख रुपये चुकीच्या पद्धतीने वाटप केले आहे. ही रक्कम व्याजासह का वसूल करू नये अशी नोटीस विशेष लेखापरीक्षक अनिल सच्चीदानंद पैलवान यांनी बजावली होती. अफहार झाल्याचे सिद्ध झाल्याने संचालक मंडळ बरखास्त केले होते. वाढीव सभासदानाही अपात्र करुन संस्थेवर प्रशासक नियुक्त केले होते. गेल्या महिन्यात नवीन संचालक मंडळ स्थापन झाले आहे.

   गुन्हा दाखल झालेले माजी संचालक : संजय पाटील, चंद्रकांत पाटील, दाजी पाटील, सर्जेराव पाटील, मारुती वरपे, बबन चौगुले, अर्जुन पाटील, भैरू पाटील, आनंदा कांबळे, शिवाजी गुरव, बाजीराव हराळे, राधाबाई चौगुले, सुवर्णा शिंदे तसेच बाळासो बाटे (सचिव),  बाबासो जगदाळे , संजय कुंभार (कर्मचारी).