2 मार्चला कोल्हापूर बंद चा इशारा

कोल्हापूर : मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती हे मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषणला बसले आहेत. या उपोषणला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास येत्या बुधवारी 2 मार्चला कोल्हापूर बंद करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या मुस्लिम बोर्डिंग येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला.

आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू असून मंगळवारपर्यंत भावनांना आवर घालू. त्यानंतर उद्रेक होईल, असे सिटी फोरमचे प्रसाद जाधव यांनी सांगितले. मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी आंदोलनाचे राजकीय भांडवल होऊ नये, असे सांगितले. दिलीप देसाई यांनी आंदोलन संयमाने घेण्याचे आवाहन केले. तर खा. संभाजीराजे छत्रपतींनी उपोषण शांततेचं आवाहन केलं आहे.दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास येत्या बुधवारी दि. 2 मार्चला कोल्हापूर बंद करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या दिला आहे.

सचिन तोडकर यांनी आंदोलनाला हिंसक वळण लागेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असे सांगितले. गणी आजरेकर यांनी राज्य शासनाच्या हातात असणार्‍या मागण्या त्यांनी तत्काळ पूर्ण कराव्यात, असे आवाहन केले. अनेक वेळा इशारा देऊनही राज्य सरकार झोपा काढत होतं काय, असा सवाल शाहीर दिलीप सावंत यांनी विचारला. समाज आता आक्रमक झाला असून, किती दिवस शांत राहयचे असा सवाल करु लागला आहे. सचिन तोडकर यांनी आंदोलनाला हिंसक वळण लागेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असे सांगितले. गणी आजरेकर यांनी राज्य शासनाच्या हातात असणार्‍या मागण्या त्यांनी तत्काळ पूर्ण कराव्यात, असे आवाहन केले.

अनेक वेळा इशारा देऊनही राज्य सरकार झोपा काढत होतं काय, असा सवाल शाहीर दिलीप सावंत यांनी विचारला. त्यामुळं आम्हाला आक्रमक व्हावे लागेल असं म्हटलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास येत्या बुधवारी दि. 2 मार्चला कोल्हापूर बंद करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.